नाशिक : तिघांनी मिळून महिलेला घातला 20 लाखांचा गंडा

नोकरीचे आमिष www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवून तिघांनी मिळून महिलेला २० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी स्वाती जनार्दन गामणे (रा. सिन्नर) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात संशयित नंदकिशोर काशीनाथ गरकळ, सुमित नंदकिशोर गरकळ व हृषिकेश गरकळ (तिघे रा. नायगाव, ता. सिन्नर) यांच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

स्वाती यांच्या फिर्यादीनुसार, २४ नाेव्हेंबर २०१७ ते २० मार्च २०२० या कालावधीत संशयितांनी गंडा घातला. संशयितांनी स्वाती यांच्या भावास नोकरी लावून देतो, असे सांगून स्वाती व त्यांच्या आईकडून धनादेश, ऑनलाइन पद्धतीने २० लाख ३६ हजार ८३८ रुपये घेतले. मात्र, भावाला नोकरी लावून दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्वाती यांनी फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : तिघांनी मिळून महिलेला घातला 20 लाखांचा गंडा appeared first on पुढारी.