
चांदवड: पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील तिसगाव येथील केशव वंसत गांगुर्डे (४९) हे विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांचा पाय घसरून ते विहिरीत पडले. यावेळी त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या घटनेबाबत संपत निवृत्ती गांगुर्डे (वय ४३) यांनी खबर दिल्याने चांदवड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस हवालदार वाय के शेवाळे करीत आहे.
हेही वाचा:
- पिंपळे गुरव : एम. एस. काटे चौकात धोकादायक खड्डा
- Asia Cup KL Rahul : केएल राहुलला शेवटची संधी? टीम कॉम्बिनेशन बिघडल्याची चर्चा
- NCRB Data : दिल्लीतील सायबर गुन्ह्यांमध्ये तब्बल 111 टक्क्यांनी वाढ, लैंगिक शोषणाच्या सर्वाधिक तक्रारी
The post नाशिक : तिसगावला विहिरीत पडून एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.