
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सन २०२२-२३ च्या इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत सोमवारी (दि. २२) तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली. यात २ हजार ९७२ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली आहे. या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील दोन दिवस अर्थात बुधवार (दि. २४) पर्यंत प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. गुरुवारी (दि. २५) पुढील प्रवेश फेरीच्या रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे.
शहरातील ६३ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीच्या २६ हजार ४८० जागांसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. नियमित दोन फेऱ्यांनंतर ११ हजार ७९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत, तर रिक्त १२ हजार १८२ जागांसाठी तिसऱ्या फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीसाठी ७ हजार ७६० विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २ हजार ९७२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये कला शाखेच्या ४७३, वाणिज्य शाखेच्या ९३८, विज्ञान शाखेच्या १ हजार ४९७, तर एचएसव्हीसी शाखेच्या ६४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तिसऱ्या गुणवत्ता यादीत निवड झालेल्या राज्य शिक्षण मंडळाच्या २ हजार ७८०, सीबीएसई बोर्डाच्या ११४, तर इतर ७८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. १ हजार ३१६ विद्यार्थ्यांना पहिल्या, तर ६१९ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. खुल्या प्रवर्गातील १ हजार ३९०, अनुसूचित जाती प्रवर्गातील ४४१, अनुसूचित जमाती प्रवर्गातील २५७, इतर मागास प्रवर्गातील ५८५, तर एसबीसी प्रवर्गातील २१ विद्यार्थ्यांना या यादीत स्थान मिळाले आहे. इन हाऊस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन कोटा प्रवेश प्रक्रियेत १ हजार २१३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामध्ये इन हाउस कोट्यातील ६८३, अल्पसंख्याकच्या ४४९, तर व्यवस्थापन कोट्यातील ८१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, तर कॅपअंतर्गत १० हजार ५७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. दरम्यान, बहुतांश महाविद्यालयांचा तिसऱ्या फेरीचा कटऑफ वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
महाविद्यालयनिहाय कटऑफ असा :
महाविद्यालय कला वाणिज्य विज्ञान
एचपीटी आरवायके 375 00 414
बीवायके 00 391 398
बॉइज टाउन 00 382 414
केटीएचएम 385 186 401
केव्हीएन नाईक 355 353 406
पंचवटी 364 349 348
नाशिकरोड बिटको 329 362 336
हेही वाचा:
- Sun : अबब! सूर्य – बुध, शुक्र आणि पृथ्वीला गिळेल? वाचा संशोधकांचे म्हणणे…
- नगर : गणेशोत्सवासाठी चोवीस तासांत परवानगी
- अकोला : हर हर शंभो…शंभो शिव महादेवा; कावड उत्सवाला अभूतपूर्व गर्दी
The post नाशिक : तिसऱ्या फेरीसाठी २,९७२ विद्यार्थ्यांना अलाॅटमेंट appeared first on पुढारी.