
सिडको : पुढारी वृत्तसेवा
येथील एका बंगल्यात घरकाम करणाऱ्या नोकराने मालक नसताना दोन मित्रांची मदत घेत घरातील सव्वातीन लाख रुपयांची रोकड चोरी केल्याची घटना रविवारी (दि.30) घडली होती. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी २४ तासांच्या आत शिताफीने नोकरासह त्याच्या दोन्ही मित्रांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तीन लाख पाच हजारांची रोकड हस्तगत केली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित नावे नोकर दीपक पिसनाथ योगी (२२) याला ताब्यात घेत त्यास खाकीचा धाक दाखवला असता त्याने अन्य दोन मित्रांच्या मदतीने चोरी केल्याचे कबूल केले. अंबडच्या गुन्हे शोध पथकाने लगेचच तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीने चोरी करणारे नीलेश बागसिंग राजपूत (२२, रा. इंदिरानगर, मूळगाव मध्य प्रदेश) तसेच राम बालुनी मिलवाडा (२३, इंदिरानगर, मूळगाव, मध्य प्रदेश) दोघेही रोकड घेऊन इंदोर येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना गरवारे पॉइंट अंबड येथे सापळा रचून ताब्यात घेतले. यावेळी या दोघांकडेही ३ लाख ५ हजार रुपयांची रोकड मिळून आली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नाईद शेख यांच्या पथकाने कामगिरी केली.
हेही वाचा :
- नरेंद्र मोदी ‘चले जाव’ आंदोलन सुरू; महाविकास आघाडीच्यावतीने पंतप्रधानांचा निषेध
- सहकारी साखर कारखानदारीला 10 हजार कोटींचा दिलासा!
- सीपीआरमध्ये औषधांचा तुटवडा
The post नाशिक : तीन लाख चोरणाऱ्या नोकरासह दोघे ताब्यात appeared first on पुढारी.