नाशिक : तीन लाख रुपये आण अशी मागणी करीत पत्नीवर धारदार शस्त्राने वार

पत्नीला मारहाण,www.pudhari.news

नाशिक : देवळाली गावातील गांधीधाम परिसरात पतीने पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि.११) सायंकाळी घडली. या हल्ल्यात सुमन राजू जाधव (रा. नागसेन नगर, वडाळा नाका) या गंभीर जखमी झाल्या आहेत. सुमन यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती राजू निवृत्ती जाधव (५०, रा. वडाळा नाका) यांनी हल्ला केला.

सुमन या माहेरी गेलेल्या असताना राजू याने घर बांधण्यासाठी तीन लाख रुपये आण, अशी मागणी केली. त्यास सुमन यांनी विरोध दर्शवल्याने राजूने पत्नीस शिवीगाळ करीत जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने वार केले. यात सुमन या गंभीर जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात राजूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : तीन लाख रुपये आण अशी मागणी करीत पत्नीवर धारदार शस्त्राने वार appeared first on पुढारी.