नाशिक : ‘ते’ दिंडीला गेले अन् चोरट्यांनी डाव साधला ; अडीच तोळे सोन्यासह रोकड लंपास

घरफोडी, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  : राजीवनगर येथील वैभव कॉलनीत चोरट्याने ४ ते १२ जुलैदरम्यान घरफोडी करून ९७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. श्रीराम राजाराम सोनार (७४) यांच्या फिर्यादीनुसार ते दिंडीसाठी गेलेले असताना चोरट्याने घराच्या किचनच्या खिडकीचे ग्रिल उचकटून घरात शिरला. त्यानंतर घरातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि २७ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : 'ते' दिंडीला गेले अन् चोरट्यांनी डाव साधला ; अडीच तोळे सोन्यासह रोकड लंपास appeared first on पुढारी.