नाशिक : ते समोरासमोर आले पण नजर मात्र टाळली…

आदित्य ठाकरे सुहास कांदे.www.pudhari.news

ओझर (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे हे एकमेकांसमोर आले पण दोघांनी एकमेकाकडे नजर देणे टाळले. निमित्त होते स्व. प्रल्हाद पाटील कराड यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट.

निफाड सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ नेते प्रल्हाद पाटील कराड यांचे नुकतेच निधन झाले. स्व. प्रल्हाद पाटील यांचे नातु सुधीर कराड हे शिवसेना निफाड तालुका ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष आहेत. तर सुहास कांदे हे देखील पूर्वाश्रमीचे शिवसेना आमदार असल्याने कांदे हे कराड यांच्या निवासस्थानी सांत्वनासाठी आले होते. कराड परिवाराची भेट घेऊन कांदे घरा बाहेर पडत असतांनाच याचवेळेस येवला दौऱ्यावर जात असलेले युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा ताफा देखील कराड यांच्या निवासस्थानी आला. आमदार सुहास कांदे आणि आदित्य ठाकरे समोरासमोर आले परंतु दोघांनी एकमेकाकडे नजर देणे टाळले. आदित्य ठाकरे हे कराड परिवाराचे सांत्वन करण्यासाठी घरात असतांना आमदार कांदे मात्र बाहेरच आपल्या वाहनात बसुन होते. दरम्यान आदित्य ठाकरे यांचा ताफा रवाना झाल्या नंतर समजदारपणाने कांदे देखील पुढील नियोजित कामासाठी रवाना झाले.

हेही वाचा :

The post नाशिक : ते समोरासमोर आले पण नजर मात्र टाळली... appeared first on पुढारी.