नाशिक : ‘त्या’ मारहाणीनंतर जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

जिल्हा रुग्णालय नाशिक,www.pudhari.news

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात महिला रुग्णाने परिचारिकेसह एका महिला कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना काल घडली.  या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून (दि. 1) काम बंद आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

काल, मीना चौधरी या कर्मचारीने महिला रुग्ण कक्षातील स्वछता करण्यासाठी रुग्णाच्या नातलगांना कक्षाबाहेर जाण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने अंबड येथील महिला रुग्नाने मीना चौधरी व परिचारिका जाधव यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांना कळवण्यात आले असून पोलीस तपास करत आहेत. तर, दोन्ही जखमीना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरु केले असून आम्हाला संरक्षण मिळालेच पाहीजे अशी मागणी कर्मचा-यांनी केली आहे. ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा पवित्रा आंदोलक कर्मचारी व परिचारिकांनी घेतला आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : 'त्या' मारहाणीनंतर जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन appeared first on पुढारी.