नाशिक : त्र्यंबकच्या आधारतीर्थ आश्रमात 4 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू

मृत्यू,

नाशिक : 

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला मुलींसाठीच्या आधारतीर्थ आश्रमातच एका चार वर्षाच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.

नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर असलेल्या तुपादेवी गावाजवळ अंजनेरी येथे हा आश्रम आहे. या आश्रमात मध्यरात्री चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या मुलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विद्यार्थ्यांने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली आहे, त्याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

The post नाशिक : त्र्यंबकच्या आधारतीर्थ आश्रमात 4 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू appeared first on पुढारी.