नाशिक : त्र्यंबकला येणार्‍या भाविकांना गुरुवारपासून दुहेरी भुर्दंड

त्र्यंबकेश्वर मंदिर,www.pudhari.news

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर शहरात खासगी वाहनांनी येणार्‍या भाविक पर्यटकांना आता वाहन प्रवेश फीसोबत शहरात वाहन उभे करण्यासाठी तासाच्या दराने पैसे मोजावे लागणार आहेत. प्रवेश करताना वाहनाच्या आकाराप्रमाणे 50 रुपये ते 200 रुपये द्यावे लागतात. त्यात आता वाहनतळ फी आकारली जाणार आहे. या आठवड्यात 11 मे पासून त्याची सुरुवात होत आहे. नगरपालिका प्रशासनाने नुकतेच शहरात नो पार्किंगचे फलक लावले आहेत. तेथे वाहन उभे केल्यास दंड करण्यात येणार आहे.

खासगी वाहन घेऊन आलेल्या भाविकांना आता पार्किंग आहे की नो पार्किंग याबाबत सावध राहावे लागणार आहे. त्र्यंबकेश्वर शहरात भाविक पर्यटकांच्या बेशिस्त पार्किंगचा फटका शहराच्या रहदारीला बसतो आहे. शहरात आलेल्या वाहनांकडून काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहन उभे करत पार्किंगच्या नावाने पैसे घेतात. त्यामुळे काही रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी होत असते. या सर्व कटकटी आता थांबतील, असे दिसत आहे.

नगर परिषदेने निश्चित केलेले पार्किंग झोन असे…
नगर परिषद पार्किंग (सर्व्हे नं. 1294 पैकी गगनगिरी आश्रमासमोरील जागा), न. प. कर्मचारी शाळेसमोरील खुली जागा, अल्पबचत भवन समोरील जागा, भूमिअभिलेख कार्यालयासमोरील जागा, चौकी माथा येथील न. प. पार्किंग, शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या समोरील जागा ज्यामुळे रहदारीस अडचण होणार नाही. रिक्षा व टॅक्सीसाठी बसस्टॅण्ड समोरील प्रवासी वाहनतळ (सार्वजनिक वाहतुकीसाठी राखीव), भाड्याने देय मालवाहतुकीसाठी लहान वाहने यांच्यासाठी न. प. पार्किंगच्या उत्तरेकडील जागा (मालवाहतूक वाहनांसाठी राखीव. नगर परिषदेकडून नो पार्किंग झोन म्हणून घोषित जागा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तीर्थराज कुशावर्त चौक, रिंगरोड ते वैकुंठधाम ते श्रीपंचायती बडा उदासीन आखाडा, अमृतकुंभ ते तेली गल्ली (मुरलीधर कदम चौक), नगर परिषद कार्यालय ते खंडेराव मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते वैकुंठधाम, शनी मंदिर ते वैकुंठधाम, गौतम तलाव परिसर, देशमुख चौक सर्व सार्वजनिक व सरकारी जागा.

नगर परिषद हद्दीत वाहनतळ फी अशी…
वाहनाचा प्रकार पहिल्या 8 तासांसाठी नंतरच्या प्रतितासांसाठी
बस                   रु. 80/- रु. 30/-
कार / जीप         रु. 50/- रु.20/-
मोटारसायकल    रु. 20/- रु.10/-
नगर परिषदेने जाहीर केलेल्या नो पार्किंग झोनमध्ये दंड
वाहनाचा प्रकार           दंड रक्कम
बस                             रु. 2000/-
कार/जीप                     रु. 1000/-
मोटारसायकल              रु. 300/-

हेही वाचा:

The post नाशिक : त्र्यंबकला येणार्‍या भाविकांना गुरुवारपासून दुहेरी भुर्दंड appeared first on पुढारी.