नाशिक : थंडीसोबत धुक्यात हरवले शहर; बोचऱ्या वाऱ्यांनी वाढला गारवा

नाशिक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहर व परिसरात तीन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून त्यातच शुक्रवारी (दि.६) पहाटे बोचऱ्या वाऱ्यांसह धुक्यात अवघे शहर हरवून गेले. थंडीचा जोर कायम असल्याने नाशिककर गारठून गेले आहेत.

उत्तर भारतामधून येणाऱ्या शीतलहरींमुळे जिल्ह्यात गारवा जाणवत आहे. नाशिक शहराचा पारा १६.४ अंशापर्यंत पोहचला असला तरी मध्यरात्री व पहाटेच्या वेळी वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नागरिकांना हुडहूडी भरली आहे. त्यातच शुक्रवारी (दि.६) धुक्यात शहर हरविले. सकाळी ९ पर्यत शहराच्या विविध भागांमध्ये धुके पडले असल्याने त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला. दरम्यान, गारव्यापासून बचाव करण्यासाठी नाशिककर शेकोट्यांभोवती गर्दी करत असून उबदार कपड्यांनाही पसंती मिळते आहे.

नाशिकरोड www.pudhari.news
पारा स्थिर झाला असून हुडहुडी भरणा-या थंडीतही अभ्यासाचा निश्चय करुन शाळेत जाणारी सावित्रीची लेक.

निफाडमध्ये देखील थंडीची लाट कायम असून तालूक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

नाशिक www.pudhari.news
थंडीचा कडाका वाढल्याने बोच-या थंडीपासून उबदार घोंगडे पांघरून गोदाकाठावरुन जाणारे ज्येष्ठ नागरिक. (सर्व छायाचित्रे: रुद्र फोटो )

हेही वाचा:

The post नाशिक : थंडीसोबत धुक्यात हरवले शहर; बोचऱ्या वाऱ्यांनी वाढला गारवा appeared first on पुढारी.