
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
थर्टी फर्स्टच्या निमित्ताने मद्यसेवन करून वाहने चालविणार्यांवर अंकुश ठेवण्यासाठी नाशिक परिक्षेत्रात विशेष मोहिम राबविण्यात आली. विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या आदेशानुसार नाशिक ग्रामीण, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत शुक्रवारी (दि. 30) रात्री केलेल्या नाकाबंदीत 277 मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वाहतूक नियम मोडणार्या 635 जणांवर दंडात्मक कारवाई केली.
नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज असतात. त्यात पार्टी, सहकुटुंब पर्यटनस्थळी जाण्याचे बेत आखलेले असतात. अनेकांनी मद्यपार्टीचे नियोजन केल्याने हॉटेल, फार्म हाउस, रिसॉर्टमध्ये मद्यसेवन करून अनेक जण वाहने चालवितात. त्यामुळे नशेत अपघात होण्याची भीती असते. त्यामुळे हे अपघात रोखण्यासोबतच मद्यपी चालकांवर अंकुश ठेवण्यासाठी नाशिक परिक्षेत्रात शुक्रवारी (दि. 30) रात्री नाकाबंदी करून कारवाई करण्यात आली. त्यानुसार पाचही जिल्ह्यांत पोलिसांनी 167 ठिकाणी नाकाबंदी करून चार हजार 609 वाहनांची तपासणी केली. त्यात 277 मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 625 चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून तीन लाख 27 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
परिक्षेत्रात तळीरामांवर अशी झाली कारवाई
जिल्हा नाकाबंदी तपासणी वाहने मद्यपी चालक इतर
अहमदनगर 35 635 60 00
जळगाव 49 1,407 83 468
नाशिक ग्रामीण 37 960 36 76
धुळे 28 1,182 54 85
नंदुरबार 18 425 44 06
हेही वाचा:
- Messi Emotional Post : मेस्सीची नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भावनिक पोस्ट , म्हणाला…
- बिस्कीट आणायला गेली आणि बनली करोडपती!
- नाशिककरांकडून नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत
The post नाशिक : थर्टी फर्स्टला 277 मद्यपी चालकांवर कारवाई appeared first on पुढारी.