Site icon

नाशिक : थायलंड वरुन आणलेल्या बुध्दमूर्ती स्थापना सोहळा उत्साहात

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा

धम्मचक्र प्रवर्तनदिनाचे औचित्य साधून वणी येथे थायलंड येथून आणलेल्या तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीची स्थापना भन्ते आर्यनाग यांच्या उपस्थितीत पंचशील त्रिसरण व पूजापाठ करून करण्यात आली.

 

वणी : येथील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेली बुद्धमूर्तीची शोभायात्रा.

प्रारंभी बुध्दमूर्तीची सजवलेल्या रथातून तसेच भन्ते आर्यनाग थेरो, भन्ते सुगत थेरो, भन्ते धम्मशरण थेरो, भन्ते धम्मरक्षित, भन्ते धम्मरत्न यांच्यासह वणी गावातून शोभायात्रा काढण्यात आली. ढोल- ताशा, पावरी नृत्य पथक, बॅण्ड वाद्याच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेत समाजबांधव पांढरे वस्त्र परिधान करून हातात पंचशील ध्वज घेऊन सहभागी झाले होते. यावेळी चौकाचौकात शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. मस्जिद चौकात वणी मुस्लीम पंच कमिटीच्या वतीने बंटी सय्यद, फईम काजी व सहकाऱ्यांनी भिक्खू संघाचे पुष्पहार घालून स्वागत केले. शिंपी गल्लीतील शिंपी बांधवांकडून सत्कार करण्यात आला. संताजी चौकात महेंद्र पारख, वणी पोलिस ठाण्याचे सपोनि. स्वप्निल राजपूत, विजय बर्डे, प्रवीण दोशी यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. प्रमुख मार्गावरून शोभायात्रा विहारात आणण्यात आली. येथे विहाराचे नामकरण श्रावस्ती करून बुध्दमूर्तीची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी भिक्खू संघाचे प्रवचन झाले. कार्यक्रमाचे आयोजन बुध्दमूर्ती स्थापना कमिटी, महिला बचतगट यांनी केले. शोभायात्रेत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

वणी :  पांढरे वस्त्र परिधान करून हातात पंचशील ध्वज घेऊन सहभागी झालेले समाजबांधव.(सर्व छायाचित्रे : अनिल गांगुर्डे)

हेही वाचा:

The post नाशिक : थायलंड वरुन आणलेल्या बुध्दमूर्ती स्थापना सोहळा उत्साहात appeared first on पुढारी.

Exit mobile version