नाशिक : थिनरने भाजल्याने अंबड मधील एकाचा मृत्यू

कृष्णा राजकुमार विश्वकर्मा www.pudhari.news
नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
थिनर ने भाजल्याने अंबड मधील एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, बुधवारी, दि. १ फेब्रुवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास कृष्णा राजकुमार विश्वकर्मा (२९, रा. इंडोलाईन कंपनीच्या मागे, अंबड, नाशिक) हा जवळच असलेल्या त्यांच्या विश्वकर्मा मोटर्स ह्या गॅरेजमध्ये काम करत होता. काम करत असताना लाईट गेल्यामुळे गॅरेजमध्ये मेणबत्ती लावून त्यांचे काम चालू होते.  परंतु अचानक मेणबत्ती खाली पडल्याने खाली असलेल्या थिनरने पेट घेतला. यामध्ये  कृष्णा विश्वकर्मा हा मोठ्या प्रमाणात भाजून जखमी झाले. कृष्णाचे दोन लहान मुले देखील तिथेच बाजूला होते. त्यांनी देखील वडिलांना वाचविण्यासाठी धाव घेतली असता, ते थिनर मुलांना लागून त्यांना दुखापत न होण्यासाठी कृष्णाने आपल्या दोघा मुलांना लांब ढकलून दिले. या सर्व प्रकरणात कृष्णा विश्वकर्मा हा मोठ्या प्रमाणात भाजून जखमी झाल्याने तातडीने औषधोपचारासाठी भाऊ पिंटु राजकुमार विश्वकर्मा यांनी सिव्हील हॉस्पीटल नाशिक येथे दाखल केले असता त्यांचा मृत्यू  झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. या दुर्घटनेने अंबड परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेची नोंद अंबड पोलिस ठाण्यात  करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे .

हेही वाचा:

The post नाशिक : थिनरने भाजल्याने अंबड मधील एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.