नाशिक: दर्शन घेऊन परतताना भाविकाचा ट्रक खाली सापडून मृत्यू

चांदवड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील खेलदरी येथील कुटुंब रेणुका देवीचे दर्शन घेऊन परतत असताना आज (दि. २३) सायंकाळी सहाच्या सुमारास अपघात होऊन प्रल्हाद नथु पवार (वय ५०) यांचा जागीच मुत्यू झाला. यावेळी पत्नी व दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. नवरात्र उत्सवा दरम्यान घटना घडल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, नवरात्र उत्सवादरम्यान चांदवड येथे रेणुका देवीचा मोठा यात्रा उत्सव असतो. खेलदरी येथील मजूर असलेले नथु पवार हे पत्नी बलवतीबाई, मुलगी सोनल व प्रतीक्षा यांच्यासमवेत मोटरसायकलवरून (एमएच १५ इएम १४०९) दर्शन घेऊन परतत होते. यावेळी मुंबई- आग्रा रोडवर पाण्याच्या टाकीजवळ अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने ट्रक खाली सापडून प्रल्हाद पवार यांचा जागीच मुत्यू झाला. तर पत्नी बलवतीबाई यांच्या डोक्यास मार लागला. मुली सोनल व प्रतीक्षा यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चांदवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा 

 

The post नाशिक: दर्शन घेऊन परतताना भाविकाचा ट्रक खाली सापडून मृत्यू appeared first on पुढारी.