
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कुरापत काढून चौघांनी मिळून एकाला मारहाण करीत दवाखान्याची तोडफोड केल्याचा प्रकार फुलेनगर येथील सम्राटनगर परिसरात घडला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सागर काळू पवार (२६, रा. दिंडोरी रोड) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित बाळा निपळुंगे, आतिष बोडके या दोघांनी बुधवारी (दि. २२) दुपारी सम्राटनगर परिसरातील डॉ. धनंजय पाटील यांच्या दवाखान्यात तोडफोड केली. कोयत्याचा धाक दाखवून संशयितांनी सागरला मारहाण केली, तर पद्माबाई रामदास लोंढे (रा. फुलेनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टोळक्याचा वाद सोडवताना संशयित सागरने त्यांना मारहाण करीत गंभीर दुखापत केली. या प्रकरणी पंचवटी पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
हेही वाचा:
- पवन खेरांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा : जामिनावर सुटका करण्याचे निर्देश
- Dada Bhuse : राऊतांचे धमकी प्रकरण प्रसिद्धीचा केविलवाणा प्रयत्न
- डोंबिवली : अनधिकृत बांधकाम प्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल
The post नाशिक : दवाखान्याची तोडफोड करून एकाला मारहाण appeared first on पुढारी.