नाशिक : दहिपूल येथे गुंडाकडून तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : शहरातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या दहिपूल येथे गुंडांनी तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी गुंडांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. गुंडांनी दाबेली विक्रेत्या महिलेस धमकी देत पैशांची मागणी केली. तसेच धारदार शस्त्रांचा धाक दाखवत गुंडांनी दहशत निर्माण करण्यासाठी वाहनांची देखील तोडफोड केली. या प्रकरणी दाबेली विक्रेत्या महिलेने अनेक दिवसांपासून असे प्रकार सुरू असल्याचा आरोप केला आहे. तसेच याबाबत पोलिसांत तक्रार देणार असल्याचेही या महिलेने स्पष्ट केले.

हेही वाचलंत का?

The post नाशिक : दहिपूल येथे गुंडाकडून तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.