नाशिक : दहिवडला बिबट्याने गायीचा पाडला फडशा

बिबट्याने गायीचा पाडला फडशा,www.pudhari.news

देवळा (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील दहिवड येथे शनिवारी (दि. २२) रात्रीच्या सुमारास बिबट्याने गायीचा फडशा पाडला असून, याठिकाणी बिबट्याच्या वाढत्या दहशतीने पशुपालकांत खबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

परिसरात जनावरांवर बिबट्याकडून सतत हल्ले सुरु असून अनेक जनावरे दगावली आहेत. वनविभागाने याची दखल घेऊन दहिवड व परिसरात बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

शनिवारी, दहिवड ता. देवळा येथील वाखारी रोड शिवारातील बापू तानाजी भारती यांच्या शेतात पहाटेच्या सुमारास  बिबट्याने गायीवर हल्ला करत तब्बल सत्तर ते ऐंशी फूटओढून नेत गायीचा फडशा पाडला. यामुळे पशुपालकांत घबराटीचे वातारण पसरले असून याबाबत देवळा वन विभागाने  दखल घ्यावी अशी मागणी येथील प्रहारचे तालुका अध्यक्ष संजय दहिवडकर यांनी केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : दहिवडला बिबट्याने गायीचा पाडला फडशा appeared first on पुढारी.