नाशिक : दाभाडीच्या स्नूषा सरपंचपदी विराजमान

dabhadi www.pudhari.news

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
दाभाडी गावाच्या सरपंचपदी संगीता किशोर निकम यांची अविरोध निवड करण्यात आली. सासू, सासरे यांच्यानंतर सुनेला सरपंचपदाचा मान मिळाल्याने हा चर्चेचा विषय ठरला.

सरपंच विद्या निकम यांनी आर्वतन पद्धतीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेसाठी मंगळवारी (दि.4) मंडळ अधिकारी एस. के. खरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपालिका कार्यालयात विशेष सभा घेण्यात आले. त्यात चांगल्याच राजकीय घडामोडी घडल्या. सरपंचपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत प्रारंभी हिरे गटाच्या असलेल्या संगीता निकम यांनी शिवसेनेच्या पाठिंब्यावर, विरोधी गटाकडून नीलिमा बाविस्कर यांच्या नावाने सुचक ग्रामपंचायत सदस्य प्रशांत निकम यांनी अर्ज दाखल केला. परंतु, त्यावर बाविस्कर यांची स्वाक्षरी नसल्यामुळे तो अर्ज फेटाळण्यात आला. परिणामी, निकम यांची सरपंचपदी अविरोध वर्णी लागली. बैठकीला सदस्या विद्या निकम, भावना निकम, सुभाष नहिरे, अविनाश निकम, दादाजी सुपारे, विशाल निकम, सोनाली निकम, सुरेखा मानकर, शरद देवरे, आशा निकम, हिरामण गायकवाड, आक्काबाई सोनवणे, सुनीता गायकवाड, अंताजी सोनवणे, प्रशांत निकम उपस्थित होते.

उलथापालथीनंतरही मिळाली संधी : संगीता निकम यांचे सासरे देवबा कारभारी निकम व सासू कमळाबाई यांनी दाभाडीचे सरपंचपद भूषविले आहे. आता सून संगीता निकम या सरपंच झाल्या. यापूर्वी त्यांनी उपसरपंचपदही भूषवले होते. त्या हिरे गटाकडून निवडून आल्या होत्या. ग्रामपंचायतीत झालेल्या सत्तांतरात बरीच उलथापालथ झाली.

मी सरपंचपदाच्या स्पर्धेत नव्हते. त्यामुळे बैठकीला अनुपस्थित होते. तरी माझ्या नावाने सरपंचपदासाठी प्रशांत निकम यांनी अर्ज दाखल केला. तो अर्ज मी दाखल केला नव्हता. त्या अर्जाशी माझा काही ही संबंध नाही. – नीलिमा नीलेश बाविस्कर.

हेही वाचा:

The post नाशिक : दाभाडीच्या स्नूषा सरपंचपदी विराजमान appeared first on पुढारी.