नाशिक : दारुचे पैसे मागितल्याने युवकासह हॉटेल व्यवस्थापकास मारहाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दारु घेतल्याचे पैसे मागितल्याचा राग आल्याने एका टोळक्याने युवकासह हॉटेल व्यवस्थापकास मारहाण केल्याची घटना औरंगाबाद नाका येथील सारंगबारमध्ये घडली.

मितेश मनीलाल राठोड (२४, रा. अमृतधाम) याच्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि.१६) रात्री साडे दहाच्या सुमारास संशयित आकाश नरोडे (२४), विकी नरोडे (२५), रवी गांगुर्डे (२५), अक्षय बेजेकर (२६), दीपक बेजेकर व इतर तीघांनी सारंगबार येथून दारु घेतली. या दारुचे पैसे मितेश याने मागितले असता कुरापत काढून संशयितांनी मितेश व हॉटेल व्यवस्थापकास बेदम मारहाण केली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : दारुचे पैसे मागितल्याने युवकासह हॉटेल व्यवस्थापकास मारहाण appeared first on पुढारी.