नाशिक : दिंडाेरीत सहाशे रुपयांची लाच स्वीकारणारा ग्रामसेवक गजाआड

नाशिक

दिंडोरी : मृत्यू प्रमाणपत्र बनवून देण्याच्या मोबादल्यात सहाशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पिंपळनारे येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.

शेवाडी येथील एका व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेवक श्रावण वामन वाकचौरे (52, रा. नाशिक) याने सहाशे रुपयांची लाच मागितली हाेती. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानंतर शुक्रवारी दुपारी वाकचौरे यास अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक एन. एस. न्याहाळदे, पोलिस निरीक्षक मीरा आदमाने यांच्या नेतृत्वाखालील प्रवीण महाजन, अजय गरुड, परशुराम जाधव यांच्या पथकाने केली.

हेही वाचा :

The post नाशिक : दिंडाेरीत सहाशे रुपयांची लाच स्वीकारणारा ग्रामसेवक गजाआड appeared first on पुढारी.