नाशिक : दिंडोरीत चार लाखांचा गुटखा जप्त

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; नाशिक ग्रामीण पोलिसांनी दि. 6 नोव्हेंबरपासून सुरू केलेल्या गुटखाविरोधी अभियानात तालुक्यामध्ये चार लाखांचा गुटखा जप्त केला. तसेच इतरही प्रकारच्या अवैध व्यवसायांविरोधात कारवाई केली जात आहे.

नाशिक – पेठ रस्त्यावर गुरुवारी (दि. 10) आंबेगण शिवारात एका कारमधून घेऊन जात असलेला सुमारे 4 लाख 7 हजार रुपयांचा अवैध गुटखा दिंडोरी पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी सागर सुरेश सोनवणे (रा. मातोरी, ता. नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अपघात कमी होण्याच्या दृष्टिकोनातून, नाशिक ग्रामीण घटकातील वाहतूक पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतूक व वाहनांच्या कागदपत्रांच्या तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. यात दि. 6 नोव्हेंबरपासून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या एकूण 538 वाहन चालकांविरुद्ध कारवाई करत 2 लाख 41 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

जिल्ह्यात अवैधरीत्या सुरू असलेल्या व्यवसायांविषयी नागरिकांना काही माहिती द्यावयाची असल्यास, नागरिकांनी पुढे येऊन ग्रामीण पोलिसांना हेल्पलाइन क्रमांक 6262 25 6363 यावर संपर्क साधावा, माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले

या अभियानांतर्गत ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकांसह पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी चार दिवसांत जिल्ह्यातील अवैधरीत्या सुरू असलेले मद्य विक्री व वाहतूक, हातभट्टीची गावठी दारू, अवैध मटका, जुगार अड्डे, अवैधरीत्या गुटख्याची विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर छापे टाकले आहेत. त्यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : दिंडोरीत चार लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.