
दिंडोरी पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यातील (जि.नाशिक) काही आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य व कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे , जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, यांच्या मार्गदर्शनाखाली दिडोरी तालुका प्रमुख किशोर कदम, सुरगाणा तालुका प्रमुख हरीभाऊ भोये यांच्या उपस्थितीत यांच्या शिंदे गटात प्रवेश केला.
जिल्हा परिषद अहिवंतवाडी गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ रोहिणी शामकुमार गावीत यांचे सासरे सदाशिव गावीत यांच्या सोबत देवसाने ग्राम पंचायतीचे उपसरपंच जालिंदर गायकवाड, चौसाळे ग्रामपंचायतीचे सदस्य सुदाम तुंगार, कार्यकर्ते रमेश झिरवाळ, भगवान झिरवाळ, आदिवासी विकास संस्थेचे चेअरमन नारायण तुगार, देवपूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भाऊराव महाले, माजी सदस्य तुकाराम महाले, दीपक बेजेकर, जोपुळच्या सरपंच चंद्रकला भाऊसाहेब जाधव, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी बोंबले, हेमंत गायकवाड, सचिन जाधव, जानोरी येथील सोमनाथ वतार,आंबादास फसाळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
हेही वाचा :
- Maheshwarastra : ब्रह्मोसनंतर भारताचे महेश्वरास्त्र; येत्या दीड वर्षात येणार लष्कराच्या भात्यात
- कोल्हापूर : आळतेत मतदानाच्या आदल्या दिवशी ‘भानामती’चा प्रकार उघड; गुलाल, लिंबू, खोबऱ्याचीच सर्वत्र चर्चा
- Andhra Pradesh Shocker : क्रौर्याची परिसीमा… प्रेयसीसाठी त्याने गर्भवती पत्नीला दिले ‘HIV’ चे इंजेक्शन!
The post नाशिक : दिंडोरीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला खिंडार; सदाशिव गावितांसह शिवसैनिक शिंदे गटात appeared first on पुढारी.