Site icon

नाशिक : दिंडोरी-चांदवड तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम पुर्ण

शिंदवड; पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यातील शिंदवड गावाजवळील फरशीवरुन पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने दिंडोरी -चांदवड या दोन तालुक्यांचा संपर्क शिंदवड गावाजवळ पाणी ओसरण्यापर्यंत बंद राहत होता. तसेच पावसाळ्यात शिंदवड ग्रामस्थ परिसरातील विद्यार्थी व प्रवासी यांना मोठा फटका बसत होता. दरम्यान अथक प्रयत्नानंतर दिंडोरी-चांदवड तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम पुर्ण झाले आहे.

फरशीवरुन २०१८ साली गावातील वामन बस्ते हे डोंगरात बैल चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी अंधारात पुराचा अंदाज न आल्याने ते वाहुन गेले. ३ दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला होता. यानंतर फरशीचे काम करण्यासाठी ‘दै. पुढारी’ ने अनेकवेळा पाठपुरावा केला होता. तसेच शिंदवड ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी गावात पुलाची गरज असुन लवकरात- लवकर पुलाचे काम मार्गी लावावे म्हणून आमदार नरहरी झिरवाळ यांना निवेदन देण्यात आले.

तसेच आमदार नरहरी झिरवाळ, जि.प सदस्य भगरे व तहसीलदार पंकज पवार यांच्याकडून देखील पुर परिस्थितीची पाहणी करण्यात आली होती. अनेक दिवसाच्या पाठपुराव्याला यश आले असुन मागील काही महिन्यापासुन पुलाचे काम युध्दपातळीवर सुरु असुन पुलाचे व फरशीचे काम पुर्ण झाले आहे. तर रस्त्याचे रुंदीकरण व त्यावर सिमेंट कॉक्रेट करण्यात आले आहे. त्याबद्दल सरपंच लताबाई बस्ते, उपसरपंच सोपान बस्ते, ग्रा. प सदस्य व ग्रामस्थांकडून आमदार नरहरी झिरवाळ व बांधकाम विभागाचे अधिकारी देसले, गांगुर्डे, भारती गायकवाड व कॉन्ट्रँक्टर मानकर, धात्रक आदींचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.

शिंदवडच्या फरशीवरुन पावसाळ्यात पाणी वाहत असल्याने वामन बस्ते वाहून गेले होते. तीन दिवसानी त्यांचा मृतदेह ग्रामस्थ व प्रशासनाला आढळून आला होता. शिंदवड ग्रामस्थांनी पुलाचे काम पूर्ण करावे म्हणून मागणी केली होती. सदर पुलाचे काम पुर्ण झाले असुन आता सुरक्षित प्रवास होणार आहे व वाहतुकदेखील सुरळीत सुरु राहिल.
-नरहरी झिरवाळ (आमदार, दिंडोरी)

पावसाळ्यात पुलावरुन पाणी ओसरेपर्यंत वाहनांच्या लांबच- लांब रांगा लागत होत्या. व सर्व वाहतुक ठप्प होवुन शेतकरी, मजुर, नोकरदार, विद्यार्थी, मालवाहतुक यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेक वर्षाचा प्रश्न मार्गी लागल्याने आनंद होत आहे.
– सोपान बस्ते

हेही वाचा : 

The post नाशिक : दिंडोरी-चांदवड तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम पुर्ण appeared first on पुढारी.

Exit mobile version