Site icon

नाशिक : दिंडोरी तालुक्यात मोफत धान्याचे 2 लाखांवर लाभार्थी

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना वर्षभर मोफत धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.  याबाबतचे आदेश दिंडोरी तालुका पुरवठा विभागाला प्राप्त झाले आहेत. या निर्णयाचा दिंडोरी तालुक्यातील 2 लाख 37 हजार 881 लाभार्थ्यांना लाभ होणार आहे.

स्वस्त धान्य वितरण योजनेद्वारे अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी या योजनेतील रेशन कार्डधारकांना महिन्याकाठी रेशन दुकानातून धान्य नियमित वितरित केले जाते. त्यामध्ये दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदूळ उपलब्ध करून दिला जातो. देशभरातील कोट्यावधी लाभार्थी या योजनेचा लाभ घेत होते. केंद्र शासनाने डिसेंबर 2023 पर्यंत मोफत नियमित धान्य देण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला असून याबाबतचे आदेश दिंडोरी तालुका पुरवठा विभागाला प्राप्त झाले. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत लाभार्थ्यांना डिसेंबर 2023 अखेरपर्यंत संपूर्ण धान्य मोफत दिले जाणार असल्याची माहिती दिंडोरी चे तहसीलदार पंकज पवार यांनी दिली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यात मोफत धान्याचे 2 लाखांवर लाभार्थी appeared first on पुढारी.

Exit mobile version