
नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील 50 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी रविवारी (दि.18) मतदान होत असून, या प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती तहसीलदार पंकज पवार यांनी दिली. दरम्यान, दिंडोरी तालुक्यात संततधार सुरू असून, मतदानावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे 45 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाच्या, तर 42 ग्रामपंचायतींमध्ये सदस्यपदाच्या निवडणुका होत असून, एकूण बूथ 166 असून, 166 मतदान अधिकारी तसेच राखीव 16 अशा एकूण 182 अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सहायक कर्मचारी 498 तसेच राखीव 48 असे एकूण 546 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तालुकास्तरीय नऊ विभागीय अधिकारी, 10 निरीक्षक व 50 मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
येथे होणार निवडणुका
आंबेगण जुने, धागूर, करंजवण, मुळाणे, अंबानेर, खेडले, जानोरी, देवपाडा, मोखनळ, वरवंडी, कोचरगाव, तळेगाव दिंडोरी, दहेगाव निगडोळ, मोहाडी, रासेगाव, फोफशी, भातोडे धाऊर, अक्राळे, आंबेवणी, कृष्णगाव, कोराटे, जऊळके दिंडोरी, वरखेडा, शिवनई, देवठाण, देवपूर, राजापूर, उमराळे खुर्द, टिटवे, कसबे वणी, पिंपळणारे, मडकीजांब, तळ्याचा पाडा, पळसविहीर, खतवड, देहरे, पिंपरखेड, माळेगाव काजी, नळवाड पाडा, नळवाडी, ढकांबे, जांबुटके चारोसे, झार्ली पाडा, कवडासर, देवघर, शिवार पाडा.
हेही वाचा:
- गोवा : अमली पदार्थांची तस्करी रोखा; गोवा, कर्नाटक राज्यपालांची सूचना
- राज ठाकरे आजपासून दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर
- नाशिक : हरिहर गडावर अडकलेल्या चौघा युवकांची सुटका
The post नाशिक : दिंडोरी तालुक्यात मतदानावर पावसाचे सावट appeared first on पुढारी.