Site icon

नाशिक : दिंडोरी तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

शुक्रवारी (दि.21) सायंकाळी ६ च्या सुमारास चाचडगाव व धाऊर परिसरात विजेच्या गडगडाटांसह पावसाने जोरदार हजेरी लावली होती. धाऊर फोपळवाडे परिसरात पत्नीसह शेतमजुरी करून घरी परतत असताना कचरू देवराम बोंबले (45, रा. धाऊर) यांच्यावर वीज पडून ते जागीच मृत झाले. त्यांची पत्नी काही अंतरावर असल्याने विजेच्या तडाख्यातून वाचली. घटनेची माहिती पोलिसपाटील मनीषा पताडे यांनी पोलिस व महसूल विभागाला कळवली असता दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण वाघ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिस उपनिरीक्षक किरण पाटील व कर्मचारी धनंजय शिलावटे हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Exit mobile version