
नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
होळीच्या दिवशी दिंडोरी नाक्याजवळील अभिषेक स्वीट्ससमोर किरण गुंजाळ नामक युवकाच्या खून प्रकरणातील तीन संशयित आरोपींची तीन दिवसांची कोठडी संपल्याने गुरुवारी (दि. ९) त्यांना न्यायालयात हजर केले असता तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली.
होळीच्या दिवशी सोमवारी (दि. ६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भररस्त्यात गळ्यावर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. या खुनातील तीन संशयितांना अवघ्या दोन तासांत पकडण्यात पोलिसांना यश आले होते. त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी त्यावेळी सुनावण्यात आली होती. अजूनही या खुनात वापरण्यात आलेल्या विनानंबरच्या रिक्षेचा शोध पोलिस घेत आहेत. तसेच आरोपींना मिळालेल्या चार दिवसांच्या कोठडीत अजून कोणाचा या खुनात सहभाग होता का हेदेखील पुढे येऊ शकते.
हेही वाचा :
- पुणे : जलपर्णीच्या कामाबाबत आयुक्तही अनभिज्ञ; माहिती न दिल्याने अधीक्षक अभियंत्याला नोटीस
- पुणे : केंद्राच्या धोरणांना राज्यातही चालना देण्याचा प्रयत्न
- जगातील सर्वात मोठा पिझ्झा!
The post नाशिक : दिंडोरी नाका खून प्रकरणातील संशयितांच्या कोठडीत वाढ appeared first on पुढारी.