नाशिक : दिल्ली विमानसेवा उद्यापासून; फ्लाइट दोन्ही वेळामध्ये असणार

नाशिक दिल्ली विमानसेवा पूर्ववत,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना विषाणूच्या महामारीपूर्वी नाशिक-दिल्ली विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने, स्पाइस जेटतर्फे ही सेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू ठेवली होती. परंतु कोरोना काळातील लॉकडाउनमुळे ही सेवा खंडित झाली. आता पुन्हा नव्याने गुरुवार (दि.4)पासून नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू केली जात असून, सकाळ आणि सायंकाळ अशा दोन्ही वेळात फ्लाइट असणार आहे.

दिल्ली येथून सकाळी 7.55 ला फ्लाइट निघणार असून, सकाळी 9.45 वाजता नाशिकमध्ये पोहोचणार आहे. त्याचबरोबर नाशिक येथून सकाळी 10.15 वाजता दिल्लीच्या दिशेने झेप घेणार असून, दिल्लीला दुपारी 12.15 वाजता पोहोचणार आहे. त्याचबरोबर सायंकाळी 6.35 वाजता दिल्ली येथून निघणारी फ्लाइट नाशिकला रात्री 8.30 वाजता पोहोचणार आहे. त्याचबरोबर रात्री 9 वाजता नाशिक येथून निघणारी फ्लाइट दिल्ली येथे रात्री 10.45 वाजता पोहोचणार आहे. त्याचबरोबर 9 आणि 10 ऑगस्ट रोजीदेखील नाशिक-दिल्ली विमानसेवा असणार आहे. पुढे ही सेवा नियमित केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोरोनानंतर पुन्हा एकदा ही विमानसेवा पूर्वपदावर येत असल्याने, नाशिक आणि दिल्लीमधील अंतर कमी होणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : दिल्ली विमानसेवा उद्यापासून; फ्लाइट दोन्ही वेळामध्ये असणार appeared first on पुढारी.