
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दिवाळीत फटाक्यांऐवजी बंदुकीतून हवेत गोळीबार करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या संशयितास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. आकाश संजय आदक (२४, रा. ध्रुवनगर, गंगापूर) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट एकमधील अंमलदार प्रशांत मरकड यांना मिळालेल्या माहितीनुसार, आकाशने हवेत गोळीबार करून व्हिडिओ व्हायरल केल्याचे समजले. मरकड यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांना दिल्यानंतर माहितीची शहानिशा करून पोलिसांनी आकाशला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने बंदुकीतून हवेत गोळीबार केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आकाशच्या ताब्यातून दीड लाख रुपयांचे पिस्तूल जप्त केले आहे. सैन्य दलातील निवृत्त नातलगाकडील परवानाधारक पिस्तुलीतून आकाशने गोळीबार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी आकाशविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- पुणे : ‘धूमस्टाईल’ने महिलांचे दागिने हिसकावणार्या टोळीला बेड्या
- Stock Market Today | केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ४०० अंकांनी वाढला
- नगर : जलजीवन योजनेची जागा ठरलेली नसताना, पाईपखरेदी; सर्व निविदा, देयकांची चौकशी करा
The post नाशिक : दिवाळीला फटाक्यांऐवजी बंदुकीतून हवेत गोळीबार करणं भोवलं appeared first on पुढारी.