Site icon

नाशिक : दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के सेस निधीतून आर्थिक लाभ

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा

देवळा नगरपंचायतीच्या वतीने दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के सेस निधीतून आर्थिक लाभ देण्यात आला असल्यची माहिती नगराध्यक्षा सुलभा आहेर यांनी दिली.

नगरपंचायतीच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी दरवर्षी पाच टक्के सेस निधीची तरतूद करण्यात येते. या निधीतून पहिल्या टप्प्यात तीस अपंग लाभार्थ्यांना तर आज दुसऱ्या टप्प्यातील बेचाळीस लाभार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये प्रमाणे निधीचे वितरण करण्यात आले . यावेळी संबंधित दिव्यांग बांधवानी समाधान व्यक्त केले . देवळा शहरातील अपंग लाभार्थ्यांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा ,असे आवाहन नगराध्यक्षा सुलभा आहेर, उप नगराध्यक्ष अशोक आहेर यांनी केले . याप्रसंगी माजी उप नगराध्यक्ष जितेंद्र आहेर ,अतुल पवार , नगरसेवक मनोज आहेर ,मुख्याधिकारी शामकांत जाधव ,कर्मचारी सुधाकर आहेर , शरद पाटील , दीपक सूर्यवंशी आदींसह लाभार्थी उपस्थित होते .

हेही वाचा:

 

The post नाशिक : दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के सेस निधीतून आर्थिक लाभ appeared first on पुढारी.

Exit mobile version