
नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
दोन संशयितांनी दुकानदाराला धमकावत शस्त्राचा धाक दाखवून दुकानाच्या गल्ल्यातील रोकड हिसकावून नेल्याची घटना पंचवटीतील भाजीमार्केट परिसरात घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात संशयित पप्पू रणमाळे, सोनू काकड यांच्याविरोधात जबरी चोरी, खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम दिलीप वराडे (२३, रा. समर्थनगर, मखमलाबाद रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि. ११) सायंकाळी 7.30 च्या सुमारास भाजीमार्केट परिसरात ते दुकानात होते. त्यावेळी हमाली काम करणारे संशयित पप्पू व सोनू दोघे दुकानात आले. पप्पूने शुभमला धमकावत रोज ३०० रुपये द्यावे लागतील, असे सांगितले होते, तर सोनूने दुकानातील काचा फोडल्या. पप्पूने चॉपरचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली व दुकानातील गल्ल्यातून दोन हजार रुपये हिसकावून नेले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- पूर परिस्थितीचा अहवाल लवकरच; पुणे शहरातील जलमय भागाची तिन्ही अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी
- Maharashtra Rain Update | मान्सून सक्रिय! ‘या’ भागांत मुसळधार पावसाचा इशारा, ‘यलो अलर्ट’ जारी
- Nashik Crime : चुंचाळेत दोन गटांत हाणामारी, बारा जणांना अटक
The post नाशिक : दुकानदाराला शस्त्राचा धाक दाखवून पैसे हिसकावले appeared first on पुढारी.