नाशिक : दुकानाचे शटर उचकटून पठ्याने एक नवे, दोन नव्हे तब्बल चाळीस मोबाइल लांबविले

चोरी,www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पंचवटी कारंजा परिसरातील मिथिला लॉजजवळील एका मोबाइल दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने दुकानातील 15 हजार रुपयांची रोकड व 40 मोबाइल असा एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

याबाबत योगेश प्रवीणचंद पोमल यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पंचवटी कारंजा पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी स्थानिक व्यावसायिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : दुकानाचे शटर उचकटून पठ्याने एक नवे, दोन नव्हे तब्बल चाळीस मोबाइल लांबविले appeared first on पुढारी.