नाशिक : दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने अपघात, एकाचा मृत्यू

देवळा, पुढारी वृत्तसेवा : येथील देवळा कळवण रोडवर वरवंडी गावाजवळील नवादेव टेकडीसमोर सोमवारी (दि.२२) एका मोटारसायकलस्वाराचे नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. पोपट नामदेव देवरे (वय ५५ रा. देवळा – देवी मंदिराच्या पाठीमागे) असे त्यांचे नाव आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, देवळा येथील पोपट नामदेव देवरे हे भारत संचार निगम लिमिटेड मध्ये मानूर शाखेत कार्यरत होते. आपले कामकाज आटोपून देवळ्याकडे मोटारसायकलने ( एमएच ४१ एके२२३६) येत असताना वरवंडी गावाजवळील नवादेव टेकडीसमोर त्यांचे वाहनावरचे नियंत्रण सुटल्याने ते रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चारीत पडले. डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत होऊन उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

हेही वाचंलत का?

The post नाशिक : दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने अपघात, एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.