
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ७० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना पंचवटीतील ड्रीम कॅसल समोर घडली. यमुनाबाई जगन्नाथ भालेराव (७०, रा. क्रांती नगर, पंचवटी) असे या वृद्धेचे नाव आहे.
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यमुनाबाई या त्यांचा नातू प्रसाद संजय भालेराव (२०) याच्यासह एमएच १५ एचए ७१७४ क्रमांकाच्या दुचाकीवरून बुधवारी (दि.२७) रात्री नऊ वाजता मखमलाबादहून क्रांतीनगरच्या दिशेने जात होत्या. त्यावेळी प्रसादने भरदाव दुचाकी चालवल्याने त्याचे नियंत्रण सुटले व दुचाकी घसरून अपघात झाला. त्यात यमुनाबाई यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात प्रसाद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- परभणी : मानवतला आठ दिवसांत दोन दुकाने चोरट्यांनी फोडली
- West Bengal SSC scam : ती ‘ब्लॅक’ डायरी आणि अभिनेत्री अर्पिता मुखर्जी; काय आहे शिक्षक भरती घोटाळ्याशी कनेक्शन?
- नगर : हर घर तिरंगा कार्यक्रम यशस्वी राबवा : माणिक खेडकर
The post नाशिक : दुचाकी घसरल्याने वृद्धेचा मृत्यू appeared first on पुढारी.