नाशिक : दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक; 11 मोटरसायकली जप्त

नाशिकरोड गाड्या-www.pudhari.news
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा 
गेल्या काही दिवसापासून नाशिक शहर व नाशिकरोड परिसरात दुचाकी गाड्या चोरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्या असून या चोरांना आळा बसावा म्हणून शहर पोलिसांनी मोटर सायकल चोरी प्रतिबंधक पथक याची स्थापना केली आहे. दरम्यान नाशिकरोड गुन्हे शोधपथक व मोटरसायकल चोरी प्रतिबंधक पथक यांच्या संयुक्त मोहिमेला यश येऊन मोटरसायकली चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तीन लाख 65 हजार रुपये किमतीच्या 11 मोटर सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
मोटरसायकल चोरी प्रतिबंध पथकातील पोलीस नाईक विशाल पाटील, मनोहर शिंदे, स्वप्निल जुंद्रे यांना मोटरसायकली चोरणाऱ्या दोघा संशयीता बाबत माहिती मिळाली असता त्यांनी संशयित आरोपी अनिकेत उर्फ सनी नंदराज अहिरे राहणार शरणपूर रोड नाशिक व संदीप नामदेव पवार राहणार मोरवाडी सिडको नाशिक या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी नाशिक शहर व नाशिकरोड परिसरात सुमारे 11 मोटरसायकली चोरी केल्याचे कबूल केले या सर्व मोटरसायकली त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या आहे.
गेल्या जुलै महिन्यापासून या पथकाने आत्तापर्यंत दोन विधी संघर्षित बालक व 19 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 26 लाख 85 हजार रुपये किमतीच्या 80 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलीस निरीक्षक गणेश नायदे राजू पाचोरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील तसेच अविनाश देवरे केतन कोकाटे विनोद लखन विशाल पाटील मनोहर शिंदे अजय देशमुख स्वप्निल जुंद्रे मुश्रीफ शेख सचिन रामराजे आदींचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक; 11 मोटरसायकली जप्त appeared first on पुढारी.