नाशिक : दुचाकी दुभाजकावर धडकून दोघा मित्रांचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना धामणकर काॅर्नर येथे उघडकीस आली. अर्णव मंगेश पाटील (२३, रा. निखिल पार्क, अंबड लिंक रोड, कामटवाडे) व करण संजय जायभावे (२२, शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) अशी मृत तरुणांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले

अर्णव व करण हे दोघे तरुण मंगळवारी रात्री घराबाहेर पडल्यानंतर रात्रभर मित्रांसोबत होते. ते बुधवारी पहाटे ३.३० च्या सुमारास मायको सर्कलकडून सीबीएसकडे जात असताना दुचाकीचालक अर्णव पाटील याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकावर आदळली. या अपघातात दुचाकी (क्र. एमएच १५, जीएस ८०६५) चालक अर्णव पाटील याचा मृत्यू झाला तर गंभीर दुखापत झालेल्या करण जायभावे याचाही मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिस ठाण्यातील पथकाने घटनास्थळी धाव घेत दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोघांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : दुचाकी दुभाजकावर धडकून दोघा मित्रांचा मृत्यू appeared first on पुढारी.