
सिडको : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहतीत संजीवनगर येथील खंडेराव मंदिर शिवनेरी चौकात दहा ते बारा जणांच्या टोळक्याने दोन युवकांवर धारदार शस्त्राने वार करून प्राणघातक हल्ला केला. यात एकजण ठार झाला असुन, दुसऱ्या जखमी युवकावर उपचार सुरू असताना त्याचे रात्री निधन झाले. या दुहेरी हत्याकांडाने संजीवनगर परिवर हादरला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन अल्पवयीनांना ताब्यात घेऊन दोन जणांना अटक केली आहे.
ठार झालेल्या युवकाचे नाव मेराज खान (वय १८ ) आहे. दुसरा गंभीर जखमी इब्राईम खान (वय २३ ) याचे रात्री उपचार सुरु असताना निधन झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित तीन अल्पवयीनांसह दोन जणांना अटक केली आहे. सर्व आरोपी चुंचाळे भागातील आहेत. लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून ही हत्या झाली असल्याचे समोर येत आहे.
हेही वाचा :
- अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाच्या मुद्यावरुन लोकसभेत प्रचंड गदारोळ
- Newsclick: हवाला प्रकरणी ‘न्यूज क्लीक’ पोर्टलला दिल्ली उच्च न्यायालयाची नोटीस
- PM Narendra Modi : ‘जे शांत तेच मणिपूरवरून राजकारण करतायत’; कपिल सिब्बल यांचा पंतप्रधान मोंदीवर हल्लाबोल
The post नाशिक : दुहेरी हत्याकांडाने संजिवनगर परिसर हादरला; तीन अल्पवयीन ताब्यात appeared first on पुढारी.