नाशिक : देवगाव पंतसंस्था व्यवस्थापकाकडून ३५ लाखांचा गैरव्यवहार

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; देवगाव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र विश्वनाथ गुरव यांनी पतसंस्थेच्या ३५ लाखांच्या रकमेचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी शासनाचे लेखापरीक्षक सुनील जडे यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पतसंस्थेच्या सभासदांचे ३५ लाख ७८ हजार रुपये आयडीबीआय बँकेतील पतसंस्थेच्या खात्यात जमा होते. गुरव यांनी १ एप्रिल २०२१ ते मार्च २०२३ या कालावधीत बनावट धनादेश तसेच रोख स्वरूपात ही रक्कम काढून स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे तपासात आढ‌ळून आले. गुरव यांनी स्वत: च्या आर्थिक फायद्यासाठी खोटा दस्तावेज तयार करुन संस्थेस खोटा हिशोब देत फसवणूक केल्याचे गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : देवगाव पंतसंस्था व्यवस्थापकाकडून ३५ लाखांचा गैरव्यवहार appeared first on पुढारी.