नाशिक : देवळालीत आज राष्ट्रवादीची निवडणूक बैठक

कॅन्टोन्मेंट बोर्ड www.pudhari.news

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा

येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज (दि. 9) सायंकाळी 4 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे पॅटर्नबाबत चर्चा होणार असल्याची माहिती ॲड. बाळासाहेब आडके यांनी दिली आहे.

लॅम रोड-बेलतगव्हाण रोडवरील कृष्णा हॉटेलमध्ये बैठक होत असून, यावेळी जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, आ. सरोज अहिरे, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हा उपाध्यक्ष रतन चावला , ज्येष्ठ नेते एन. डी. गोडसे, तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे, देवळाली विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बोराडे, तालुका कार्याध्यक्ष निवृत्तीमहाराज कापसे, सोमनाथ खातळे आदींसह नेते मार्गदर्शन करणार आहे. यावेळी इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला जाणार आहे. परिसरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, इच्छुकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शहराध्यक्ष आडके, महिला अध्यक्षा सायरा शेख, युवक अध्यक्ष रवींद्र धुर्जड, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष वसीम शेख आदींनी केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : देवळालीत आज राष्ट्रवादीची निवडणूक बैठक appeared first on पुढारी.