नाशिक: देवळा तालुक्यात गुरूवारपासून तीन दिवस कृषी सेवा केंद्र बंद

देवळा; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या प्रस्तावित कायदा क्रमांक ४०, ४१.४२, ४३.व ४४ यातील जाचक अटींच्या निषेधार्थ देवळा अॅग्रो डीलर असोसिएशनच्या वतीने गुरुवारपासून (दि २) सलग तीन दिवस तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  यासंदर्भात तहसीलदार विजय सूर्यवंशी, सपोनि दीपक पाटील यांना असोशिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले .

देवळा तालुका अॅग्रो डीलर असोसिएशन ही माफदा संस्थेच्या अधीन कार्यरत आहे. राज्य सरकारने नवीन प्रस्तावित कायद्यात ज्या जाचक अटी व नियम लागू करायचे ठरविले आहे. त्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कृषी सेवा केंद्र दि. २, ३ व ४ नोव्हेंबररोजी बंद राहणार आहे. या पत्राद्वारे आम्ही आपल्याला सुचित करीत आहोत की, देवळा तालुक्यातील सर्व कृषी केंद्र (ग्रामीण व शहर) २, ३, व ४ नोव्हेंबर रोजी बंद राहतील. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे .

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पवार, माफदाचे संचालक जगदीश पवार, विनोद पाटील, मनोज पवार, संदीप चव्हाण, विजय लुंकड, सतीश भामरे, मयूर आहेर, प्रसाद अहिरे, राजेंद्र थोरात, ताराचंद जाधव, किरण खैरनार, सम्राट वाघ, अभिजित निकम, बापू गुंजाळ, दिनेश वाघ, सुनील बर्वे, राहुल शिंदे, मयूर आहेर आदी विक्रेते उपस्थित होते.

हेही वाचा 

The post नाशिक: देवळा तालुक्यात गुरूवारपासून तीन दिवस कृषी सेवा केंद्र बंद appeared first on पुढारी.