नाशिक : देवळा निरंजन पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा

निरंजन देवळा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक संस्थेचे माजी चेअरमन योगेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बिनविरोध पार पडली.

बिनविरोध निवडून आलेले गट निहाय उमेदवार असे : (सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी); उत्तम श्रावण आहेर, दगा कारभार आहेर, दीपक मुरलीधर आहेर, प्रदीप विठ्ठल आहेर, रवींद्र रामभाऊ आहेर, राजेश महारू आहेर, सुनील गंगाधर आहेर, दीपक मांगु निकम तर शांताबाई चिंधा गुजरे(अनुसूचित जाती जमाती), जिजाबाई खंडेराव आहेर,विमलबाई शिवाजी आहेर(महिला राखीव),योगेश शांताराम आहेर,(इतर मागासवर्गीय गट)दादाजी मोतीराम सोनवणे(भटक्या विमुक्त जाती जमाती गट ) याप्रमाणे वरील उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याकामी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक सुजय पोटे यांनी कामकाज बघितले . बिनविरोध निवडून आलेल्या सर्व प्रतिनिधींचे सहकार क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : देवळा निरंजन पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध appeared first on पुढारी.