नाशिक : देवळा पंचायत समिती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित 

देवळा पंचायत समिती ,www.pudhari.news

देवळा ; पुढारी वृत्तसेवा 

अमृत महाआवास अभियान सण २०२२/२३ मध्ये देवळा पंचायत समितीला उत्कृष्ट काम केल्याबद्दल ग्रामविकास मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते राज्य पुरस्कृत आवास योजेतर्गंत जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देवळा पंचायत समितीने अमृत महाआवास अभियान सण २२/२३ मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांची घरकुले पूर्ण करून त्यांना लाभ दिल्याबद्दल देवळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश देशमुख यांचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रक्लप संचालक प्रतिभा संगमनेर यांनी कौतुक केले आहे.

या पुरस्कार प्राप्त पंचायत समितीला  १५  ऑगस्ट रोजी  ग्रामविकास मंत्री ना. गिरीष महाजन,  केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेर, महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल, आमदार सीमा हिरे, सर्व विभाग प्रमुख, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : देवळा पंचायत समिती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित  appeared first on पुढारी.