देवळा ; पुढारी वृत्तसेवा देवळा शहरातील महाविद्यालय परिसरात असलेल्या एका कॅफे हाऊसवर देवळा पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणी काही तरुण तरुणी अश्लील चाळे करताना आढळून आल्याने पोलिसांनी कॅफे सांचालकावर कारवाई केली आहे. या प्रकाराने खळबळ उडाली असून, पालकांनी याबाबत सतर्क राहावे, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येत असतात. महाविद्यालय परिसरात असलेल्या कॅफे हाऊस मध्ये तरुण-तरुणी चहा कॉफी पिण्यासाठी जात असतात. परंतु काही कॅफेत मात्र चहा-कॉफीच्या नावाखाली वेगळेच कारनामे सुरू असल्याची समोर आले आहे.
देवळा येथील महाविद्यालय परिसरात सटाणा रस्त्यावर डी एस पी बासुंदी नामक चहाचे हॉटेल असून, या हॉटेलमधील एका रूममध्ये जोडप्यांना जास्तीचे पैसे घेऊन जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची व अश्लील चाळे होत असल्याची गोपनीय माहिती देवळा पोलिसांना मिळाली. शनिवारी दि १६ रोजी सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील, पोलीस नाईक बच्छाव, ज्योती गोसावी यांच्या पथकासह नमूद कॅफेवर छापा टाकला. यावेळी त्यांना या ठिकाणी हा प्रकार आढळून आला. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून हॉटेल मालकावर कारवाई केली आहे.
नमूद कॅफेच्या आत एक छोटीशी रूम व टेबल खुर्च्या ठेवलेल्या आढळून आल्या. सदर ठिकाणी काही जोडपे येऊन त्यांचा निवांत वेळ घालवत असतात. सदर कारवाईने अश्लील चाळे करणाऱ्या तरुणांचे धाबे दणाणले असून, सदर कारवाईने महाविद्यालयातील शिक्षकांनी व पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
यानंतर कुठले हॉटेल किंवा इतर दुकानात असे प्रकार खपवून घेतले जाणार नसून, असा प्रकार आढळून आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी दिली.
हेही वाचा :
- Manoj Jarange-Patil : मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही : मनोज जरांगे- पाटील
- संसद सुरक्षा भंग प्रकरण दुर्दैवी आणि चिंताजनक : पंतप्रधान नरेंद्र मोदी
- Mumbai Indians Captain Dispute : मुंबई इंडियन्समध्ये मोठी फूट? हार्दिक पंड्यामुळे संघात निर्माण झाला तेढ?
The post नाशिक ; देवळा शहरातील कॅफेवर पोलिसांचा छापा appeared first on पुढारी.