नाशिक : दोघे चोरटे जेरबंद; दोन दुचाकी हस्तगत

दोघे दुचाकी चोर जेरबंद,www.pudhari.news

नाशिक : दोन दुचाकी चोरट्यांना जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाला यश आले आहे. कुणाल विजय लहांगे (१८, रा. कोळीवाडा संसारीगाव) व वेदांत चंद्रकांत बच्छाव (१८, रा. पांजरा कॉलनी, ता. साक्री, जि. धुळे) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी ही पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

शहरासह उपनगरांमध्ये दुचाकी चोरीचे सत्र सुरू असून, वाहनचोरीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी गुन्हेशाखेला शोध घेण्यासाठी आदेश दिले हाेते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय ददन पासवान (२२, रा. देवळाली कॅम्प) यांची दुचाकी इमारतीच्या वाहनतळावरून अज्ञात चोरट्यांनी लांबविली होती. गुन्हे शाखा दोनकडून समांतर तपास सुरू असताना कुणाल लहांगे याने साथिदारांसह चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून लहांगे यास अटक केल्यानंतर बच्छाव यास धुळ्यातून ताब्यात घेतले.

या कारवाईत पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, सहायक पोलीस आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांनी सुचनांप्रमाणे हवालदार गुलाब सोनार, नंदकुमार नांदुर्डीकर, राजेंद्र घुमरे, अनिल लोंढे, संतोष ठाकूर आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा :

The post नाशिक : दोघे चोरटे जेरबंद; दोन दुचाकी हस्तगत appeared first on पुढारी.