नाशिक : दोन्ही पाय नसतानाही नृत्याविष्कार, प्रेक्षकांची दिलखुलास दाद

दोन्ही पाय नसताना नृत्याविष्कार,www.pudhari.news

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

नुकत्याच नाशिक येथे पार पडलेल्या जि. प. नाशिक अध्यक्ष चषक स्पर्धेत माध्यमिक विद्यालय अवनखेडचा दोन्ही पाय नसलेला दिव्यांग विद्यार्थी ओमकार माणिक कोकाटे याने अद्भूत नृत्य सादर करून जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला.

दोन्ही पाय नसूनही लालित्यपूर्ण विविध शारीरिक हालचाली, कसरती करून या विद्यार्थ्याने नृत्य सादर करत प्रेक्षकांच्या टाळ्यांनी मोठी दाद मिळविली. जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या विद्यार्थ्याचे विशेष कौतुक केले. ओमकारला पंचायत समिती दिंडोरी गट साधन केंद्राच्या शिक्षिका परदेशी, रिना पवार व शिक्षक प्रदीप नवले यांनी मार्गदर्शन केले. त्याच्या यशाबद्दल मुख्याध्यापक विलास शिंदे, संस्थेचे सचिव बाळासाहेब उगले, उपाध्यक्ष सुभाष शिंदे, अध्यक्ष शहाजीदादा सोमवंशी, कादवा सहकारी साखर कारखाना अध्यक्ष श्रीराम शेटे, गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज व दिंडोरी शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी, अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव, उपसरपंच मंगेश जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास पाटील व ग्रामस्थांनी कौतुकाचा वर्षाव केला.

हेही वाचा : 

The post नाशिक : दोन्ही पाय नसतानाही नृत्याविष्कार, प्रेक्षकांची दिलखुलास दाद appeared first on पुढारी.