नाशिक : दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍यास कारावास

न्यायालय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अल्पवयीन मुलींना घरात बोलावून त्यांचा विनयभंग करणार्‍यास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. माणिक चोखाजी खिल्लारे (35, रा. राजीवनगर) असे या आरोपीचे नाव आहे.

पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार 30 डिसेंबर 2019 रोजी माणिक याने 12 व 14 वर्षीय मुलींचा विनयभंग केला. दोन्ही मुली घरात खेळत असताना माणिक याने दोघींना बोलवून विनयभंग केला. हा प्रकार पीडितांनी पालकांना सांगितल्यानंतर पीडितेच्या आईने माणिकविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात विनयभंगासह पोक्सोची फिर्याद दाखल केली. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक प्रवीण बाकले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. दीपशिखा भिडे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयात सात साक्षीदार तपासले. माणिकविरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी माणिकला शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍यास कारावास appeared first on पुढारी.