नाशिक : दोन वाहनामध्ये भीषण अपघात; १६ प्रवाशांसह चालक जखमी

टेम्पो ट्रॅव्हलर

अंदरसुल ; पुढारी वृत्तसेवा : टेम्पो ट्रॅव्हलर व मालवाहू पिकअप यांच्या भीषण अपघातात १६ प्रवाशांसह पिकअप चालक जखमी झाल्याची घटना घडली. अंदरसुल (दि.१६) टेम्पो ट्रॅव्हलर व पिकअप यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघात होऊन ही  घटना घडली.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार, नाशिक येथील (एम एच ०४ एफ के ३९४९) या ट्रॅव्हलरमधून आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथील पर्यटकांना वेरूळहून नाशिककडे घेऊन जात होती. रविवारी (दि. १५) रात्री सुमारे ८.३० वाजेच्या सुमारास खामगाव पाटी चौफुलीवर समोरून येवल्याकडून वैजापूरच्या दिशेने जात असलेली  (क्रं. एम एच १७ डी वाय ६६६३) ही पिकअप या दोन वाहनाच्या समोरासमोरील धडके होऊन अपघात झाला. यामध्ये १६ प्रवाशी जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी वैजापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

दरम्यान, काही गंभीर प्रवाशांना पुढील उपचारासाठी नाशिक सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टेम्पो ट्रॅव्हलर चालक मनोज यशवंत शेवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मालवाहतूक पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पिकअप चालक जखमी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र पिकअप चालकाचे नाव अद्याप समजू शकले नाही. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर हेमाडे करीत आहे.

हेही वाचा;

The post नाशिक : दोन वाहनामध्ये भीषण अपघात; १६ प्रवाशांसह चालक जखमी appeared first on पुढारी.