
नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
अंबड पोलिसांनी दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून सात कोयते व तलवारी जप्त केले. या दोघांविरोधात शस्त्र अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून सात कोयते व तलवारी जप्त करण्यात आल्या.
अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज पत्की यांनी शस्त्र बाळगणार्यांविरोधात कारवाईचे आदेश दिले होते. पोलिस शिपाई समाधान शिंदे व जनार्दन ढाकणे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे म्हाडा कॉलनीतील म्हसोबा मंदिराजवळ शस्त्रांसह युवक फिरत असल्याचे समजले होते. अंबडचे सहायक पोलिस निरीक्षक वसंत खतेले, शिपाई मुकेश गांगुर्डे, सचिन करंजे, तुषार देसले, प्रवीण राठोड, घनश्याम भोये, अनिल ढेरंगे, दीपक जगताप, संदीप भुरे आदींच्या पथकाने सापळा रचून गोपाल डुगलज (19, रा. म्हाडा कॉलनी, जाधव संकुल) व प्रवीण गायकवाड (19, रा. पंडितनगर, सिडको) या दोघांना पकडले. त्यांच्याकडे पोलिसांना कोयते व तलवारी सापडल्या. संशयितांनी काही धारदार हत्यारे म्हसोबा मंदिरामागे लपविल्याचेही समोर आले. त्याही पोलिसांनी जप्त केल्या. पोलिसांनी दोघांविरोधात शस्त्र बागळल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोघेही संशयित महाविद्यालयीन विद्यार्थी असून त्यांच्या नावावर याआधी कोणताही गुन्हा दाखल नसला, तरी ते इतर गुन्हेगारांच्या संपर्कात असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. शस्त्र बागळण्याचा दोघांचा हेतू जाणून घेण्याचा प्रयत्न अंबड पोलिस करीत आहेत.
हेही वाचा:
- किडणीच्या यशस्वी प्रत्यारोपणानंतर लालू प्रसाद यादव भारतात परतले
- नाशिक : ‘त्यांनी’ जलयुक्त शिवाराचा गळा घोटला – खासदार अनिल बोंडे
- Benefits Of Tea Powder : वापरलेली ‘चहा पावडर’ खूपच फायदेशीर; असा करा वापर
The post नाशिक : दोन विद्यार्थ्यांकडे सापडले सात कोयते आणि तलवारी appeared first on पुढारी.