नाशिक : द्राक्षनगरीत आंब्याची आवक वाढली, दर टिकून

आंबा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याची आवक मागील सप्ताहाच्या तुलनेत सध्या वाढली आहे. फळबाजार आवारात एक हजार ९३१ क्विंटल आवक झाली. त्यास किमान १६ हजार, तर कमाल २५ हजार, तर सरसरी २० हजार रुपये दर मिळाला. एकीकडे आवक वाढली असती तरीही दर टिकून असल्याचे बाजार समितीने दिलेल्या माहितीवरून समोर आले आहे.

आठवड्यात भाजीपाल्याच्या आवकेनुसार दरात चढउतार झाल्याचे पाहायला मिळाले. वालपापडी घेवड्याची आवक ६ हजार १४३ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल १ हजार ५०० ते २ हजार ५०० असा तर सरासरी दर २ हजार रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल ३ हजार ५०० ते ७ हजार तर सरासरी दर ५ हजार ५०० रुपये राहिला. हिरवी मिरचीची आवक १ हजार ८२१ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल १ हजार ५०० ते २ हजार ५०० रुपये तर सरासरी दर २ हजार रुपये मिळाला. गाजराची आवक २ हजार ९८६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १ हजार ते १ हजार ५५० तर सरासरी दर १ हजार ३०० रुपये राहिला.

उन्हाळ कांद्याची आवक ७ हजार ५८७ क्विंटल झाली. प्रतिक्विंटल २०० ते ९५० तर सरासरी दर ६०० रुपये राहिला. लसणाची आवक ४०० क्विंटल झाली. प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ८ हजार ४०० तर सरासरी दर ६ हजार ५०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ५ हजार ८७८ क्विंटल झाली. प्रतिक्विंटल ९०० ते १ हजार ४०० तर सरासरी दर १ हजार २०० रुपये राहिला.

हेही वाचा :

The post नाशिक : द्राक्षनगरीत आंब्याची आवक वाढली, दर टिकून appeared first on पुढारी.